केरळमधील शबरीमला मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत. सुरक्षेसंदर्भात मी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्रही लिहिले आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. आता कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडला तर आमची जबाबदारी नसेल असे आता तृप्ती देसाईंनी म्हटले आहे. शबरीमला मंदिरात तृप्ती देसाई प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ नोव्हेंबरला त्या या मंदिरात जाणार आहेत. मंदिरात प्रवेश करताना आम्हाला सुरक्षा पुरवा असे पत्र तृप्ती देसाई यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना लिहिले आहे.

पी. विजयन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी केरळ सरकारची असेल आमची नाही असा इशाराच तृप्ती देसाईंनी दिला आहे. तृप्ती देसाई या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून बराच वाद रंगला होता.

पी विजयन यांनी शबरीमला मंदिराबाबत काय म्हटले आहे?
सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबरला शबरीमला मंदिरात महिलांनी जाण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे. आमचे सरकार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाही. भक्तांच्या श्रद्धेबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र तेवढाच आदर आम्हाला कोर्टाच्या निर्णयाबद्दल आहे असे पी. विजयन यांनी म्हटले आहे.