News Flash

…म्हणून मी नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आलो – गुप्तेश्वर पांडे

निवडणूक लढणार की नाही? याबद्दलही दिली माहिती

संग्रहीत छायाचित्र

बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांवर सर्वत्र झळकत असताना, या पार्श्वभूमीवरच खुद्द गुप्तेश्वर पांडे यांनी एक खुलासा केल्याचे समोर आले आहे. निडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

गुप्तेश्वर पांडे यांना माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला व राजकीय पदार्पणासह आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले. तसेच, यासाठीच तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला आला आहात का? ही देखील विचारणा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर पांडे यांनी खुलासा केला.

“मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं असल्याचं एएनआयने दिलं आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचे तसेच, बिहार निवडणूक लढवण्यासाठीच गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. खरंतर गुप्तेश्वर पांडे यांनी सुरुवातीला आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी त्यात चूक काय असं म्हणत राजकारणात पदार्पणाचे संकेतही दिले होते.

आयपीएस अधिकारी असलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांच्या निवृत्तीचा निर्णय स्वीकारण्यात आला. कार्यकाळ संपण्यासासठी अवघे पाचच महिने शिल्लक असताना त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. तेव्हाच गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 2:13 pm

Web Title: i have yet not taken any decision on contesting polls gupteshwar pandey msr 87
Next Stories
1 लस येण्याआधी करोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात, WHO ने व्यक्त केली भीती
2 “…त्याचप्रमाणे शिरोमणी अकाली दलाच्या एका बॉम्बनं मोदी सरकार हादरलंय”
3 मालदीवने भारताला साथ देत पाकिस्तानला दिला झटका
Just Now!
X