18 February 2019

News Flash

माझे पाकिस्तानवर तितकेच प्रेम आहे जितके भारतावर: मणिशंकर अय्यर

भारताने आपल्या शेजारी  देशावर प्रेम केले पाहिजे, असा सल्ला दिला.

मणिशंकर अय्यर (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कराची येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानचे कौतुक करत पाकिस्तानवर मी तितकेच प्रेम करतो जितके मी भारतावर करतो, असे म्हटले. पाकिस्तान चर्चेसाठी आपले मार्ग खुले ठेवू इच्छितो यावर मला गर्व आहे. पण भारत सरकार असे करू शकला नाही, याचे दु:खही वाटत असल्याचे ते म्हणाले.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात अय्यर यांनी दोन्ही देशांमध्ये बंद पडलेली चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा सल्ला दिला. ही काळाची मागणी आहे, असे म्हणत केंद्र सरकारवर हल्लाही केला. पाकिस्तान चर्चेसाठी तयार असताना भारत सरकार यासाठी तयार नसल्याचे ते म्हणाले.

मी पाकिस्तावर प्रेम करतो. कारण मी भारतावरही प्रेम करतो. भारताने आपल्या शेजारी  देशावर प्रेम केले पाहिजे, असा सल्ला दिला. काश्मीर आणि भारतात होणाऱ्या दहशतवादी घटना या दोन समस्या आहेत. जी सर्वांत आधी सोडवली जावी, असे ते म्हणाले. अय्यर यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर मात्र मोठा समाचार घेतला जात आहे.

मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने हात वर करत अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

First Published on February 13, 2018 11:42 am

Web Title: i love pakistan because i love india mani shankar aiyar