सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्कृष्ट हार्डवेअर वापरलेला स्मार्टफोन, अशी ओळख असलेला अॅपलच्या बहुप्रतिक्षित ‘आयफोन ६एस’ आणि ‘६ एस प्लस’ची ऑस्ट्रेलियात शुक्रवारपासून विक्री सुरू झाली. आयफोन खरेदीसाठी विक्री केंद्राबाहेर रांग लागणे ही तशी नवी गोष्ट नाही. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका महिलेने आयफोन ६एस या ‘स्मार्ट’फोनच्या खरेदीची रांग लागवण्यासाठी एखाद्या तंत्रप्रेमीला शोभेल अशी ‘स्मार्ट’ युक्ती योजली. लुसी केली या ऑस्ट्रेलियन महिलेने ‘आयफोन ६ एस’च्या खरेदीसाठी एका रोबोटला आपला प्रतिनिधी म्हणून रांगेत उभेत केले होते.

सहाजिकच मला माझी दैनंदिन कामे करायची असतात. कामावर जायचे असते. मग, आयफोनच्या खरेदीसाठी रांगेत ताटकाळत राहणे माझ्यासाठी शक्य नव्हते. मग माझ्या वरिष्ठांनी मला आमच्या कार्यालयातील एक रोबोट घेऊन जाण्यास सांगितले आणि तो माझा प्रतिनिधी म्हणून रांगेत उभा करण्याचा सल्ला दिला, असे लुसीने रोबोटवर लावण्यात आलेल्या आयपॅडवरून उपस्थितांना सांगितले. त्यानुसार लुसीने शुक्रवारी आयफोनच्या विक्री केंद्राबाहेर आपला ‘आय रोबोट’ रांगेत उभा केला होता. लुसीच्या या अनोख्या युक्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रांगेत उभे असलेल्यांपैकी काहींनीतर आयफोन खरेदी केल्यानंतर लुसीच्या रोबोटसह सेल्फी देखील टीपला आणि तिच्या ‘स्मार्ट’नेसचे कौतुक देखील केले.
ihpone1

दरम्यान, आयफोन ६ एस आणि ६एस प्लस विकत घेण्यासाठी ऑस्ट्रेलियातील तंत्रप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता यावेळी पाहायला मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यावेळी आयफोनच्या खरेदीत वाढ होऊन पहिल्या आठवड्यात १२ ते १३ लाख आयफोन्सची विक्री होईल असा अंदाज कंपनीच्या विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी आयफोनच्या आधीच्या आवृत्तीची पहिल्या आठवड्यात १० लाखांपर्यंत विक्री झाली होती. आयफोन ६ एस आणि ६ एस प्लस हे अॅप्पलच्या आयफोन श्रेणीतील आतापर्यंतचे सर्वाधित अद्ययावत स्मार्टफोन्स आहेत. आयफोन ६ एस आणि एस प्ल हे मोबाईल्स थ्री डी टच, ५.५ इंचांचा स्क्रीन अशा अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आहेत.