News Flash

‘कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी अमित शाह यांची ऋणी आहे’, कंगनाच्या आईची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सरकारने कंगनाला दिलेली वागणूक निषेधार्ह

“माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते. मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की सगळा देश माझ्या मुलीसोबत म्हणजेच कंगनासोबत उभा राहिला. लोकांचे आशीर्वाद तिच्या पाठिशी आहेत. मला कंगनाचा अभिमान वाटतो. कंगनाने कायमच सत्याची कास धरली आहे. एवढंच नाही ती यापुढेही तिच्या सत्यावर ठाम राहिल याची मला खात्री आहे” असंही आशा रणौत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने आपल्याला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर राजकीय आणि सिनेक्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. खासकरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं. ज्यानंतर मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हान कंगनाने दिलं होतं. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. वाय दर्जाची सुरक्षा पुरवल्याबद्दल कंगनानेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते. आता कंगनाची आई आशा रणौत यांनीही अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान ९ तारखेला कंगना मुंबईत आली. त्यावेळी मुंबई महापालिकेने तिचे कार्यालय अनधिकृत असल्याचे ठरवत तोडक कारवाई केली. यानंतर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची भेट घेतली. कंगनाला घाबरण्याची गरज नाही आम्ही तिच्यासोबत आहोत असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. तसंच कंगनाला पाठिंबाही जाहीर केला आहे. ऑफिसमधल्या फर्निचर मोडतोड प्रकरणी कंगना रणौतने कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 9:10 pm

Web Title: i thank mr amit shah for providing security to kangna says her mother asha ranaut scj 81
Next Stories
1 लडाख वाद : पँगोंग त्सोमध्ये उंचीवर पोहोचलं भारतीय लष्कर; चीनविरोधात स्थिती मजबूत
2 कंगना-शिवसेना वादावर वाराणसीत झळकलं वादग्रस्त पोस्टर; महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाचा वापर
3 अखिल भारतीय आखाडा परिषदेचा कंगनाला पाठिंबा; राज्य शासनावर केली टीका
Just Now!
X