जगभरात आपल्या दहशतीने थैमान घातलेल्या ‘आयसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटेशी मुकाबला करण्यासाठी भारताने अमेरिका आणि इस्त्रायलसोबत एकत्र यावे. याचा चांगला उपयोग होईल, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे.


आयसिसने जगाला आव्हान दिले असून त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आयसिसचे जगात ज्या ठिकाणी अस्तित्व असेल ते उखडून काढण्यासाठी भारताने अमेरिका आणि इस्त्रायलसोबत एकत्र यायला हवे. आपल्याकडे संख्याबळ आहे, अमेरिका आधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असून इस्त्रायलकडे सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. या तीनही गोष्टी एकत्र आल्यास एक ताकदवान दल तयार होईल. त्यामुळे आयसिसचा ज्या कुठल्या देशात तळ असेल तेथे आपले सैन्य पाठवण्यात संकोच करता कामा नये, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

आयसिसने मोसुलमध्ये अपहरण केलेल्या ३९ भारतीयांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत ही माहिती दिली होती. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झाले होते. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. आयसिसने २०१४ मध्ये मोसुलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचं अपहरण करुन ओलीस ठेवले होते. भारतीय मोसुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच आयसीसने त्यांचे अपहरण केले होते.