मी पंतप्रधान निवासस्थानात राहणार नाही अशी घोषणा पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. पंतप्रधान निवासस्थानाची जागा इतकी मोठी आहे त्या जागेचा उपयोग आम्ही शैक्षणिक कार्यासाठी करण्याबाबत निश्चितपणे विचार करू. पाकिस्तानात करचोरीचे प्रमाण वाढले आहे त्यावर नियंत्रण आणू असेही आश्वासन इम्रान खान यांनी दिले. युवकांचा विकास, प्रगती यावर निधी खर्च केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये १२० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार तेच मानले जात आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली.
Pehle hukmaran, ruling elite, apne aap pe kharch karte the, aaj se ye nahi hoga.hum saadgi se rahenge, itne bade Prime Minister house mein nahi, chhoti se jagah dekhenge koi. Main awam ke tax ki hifazat karoonga: Imran Khan,PTI Chief #PakistanElections2018 pic.twitter.com/4H3om0wT39
— ANI (@ANI) July 26, 2018
पाकिस्तानला शांततेची आवश्यकता आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचेही खान यांनी म्हटले आहे. गरीबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले. गव्हर्नर हाऊस आणि इतर सरकारी इमारतींमध्ये व्यापार, व्यवसाय कसा करता येईल यावर भर दिला जाणार. तसेच सगळ्या आलिशान निवास्थानांमध्ये शैक्षणिक कार्य, वैद्यकीय सेवा किंवा इतर समाज उपयोगी कामे कशी करता येतील यावरही भर देऊ असेही खान यांनी म्हटले आहे. चीनकडून आम्ही भ्रष्टाचार नियंत्रण शिकतो आहोत. असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्या देशाप्रमाणेच पाकिस्तानची प्रगती साधायची आहे अशीही इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली. तसेच देशातल्या सगळ्या सरकारी इमारतींमध्ये व्यवसाय कसे सुरू करता येतील यावर आमचा भर असणार आहे. लोकांनी भरलेला टॅक्स त्यांच्याच विकासासाठी वापरला जाईल त्यात भ्रष्टाचार होणार नाही याचीही खबरदारी घेऊ असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या संसदेत २७२ जागा असून त्यापैकी १२० जागांवर इम्रान यांचा पक्ष आघाडीवर आहे. पाकिस्तानातील अन्य पक्षांनी ही निष्पक्ष निवडणूक नसल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असली तरी ते अजूनही बहुमतापासून दूर आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 6:16 pm