28 September 2020

News Flash

इंडियन एअर फोर्सचं मिग-२९ विमान कोसळलं

इंडियन एअर फोर्सचं मिग-२९ फायटर विमान शुक्रवारी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये कोसळलं.

इंडियन एअर फोर्सचं मिग-२९ फायटर विमान शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झालं. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळलं. जालंधरमधल्या एअर फोर्सच्या बेसवरुन नियमित सरावासाठी या फायटर विमानाने उड्डाण केलं होतं.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं. जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-२९ चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिग-२९ हे रशियन बनावटीचे विमान असून १९९९ साली कारगिल युद्धात शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता. एअरफोर्सकडे ६० पेक्षा जास्त मिग-२९ विमाने आहेत. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. मल्टीरोल म्हणजेच बहुउद्देशीय प्रकारामध्ये ही फायटर विमाने मोडतात. एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड अशा दोन्ही मिशन्ससाठी ही विमाने उपयुक्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 1:10 pm

Web Title: iaf mig 29 fighter jet crashes in punjab dmp 82
Next Stories
1 नायकूच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये ‘डॉक्टर’ होणार हिजबुलचा कमांडर?
2 काश्मीरसाठी पाकिस्तानचा ‘नापाक प्लान’, उभारली नवी दहशतवादी संघटना
3 चार दिवसात वाढले १०,००० रुग्ण; मुंबईतील संख्या सर्वाधिक
Just Now!
X