News Flash

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल

फ्रान्सने पहिले विमान भारताला दिले आहे अशी माहिती समोर आली आहे

फोटो सौजन्य- ANI

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे. फ्रान्सने हे विमान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय वायुदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता. इतकंच नाही तर राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली असंही काँग्रेसने म्हटलं होतं.

राफेल करारावरुन सत्ताधारी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. नेमका किती रुपयांचा करार झाला? हे निर्मला सीतारामन का सांगत नाहीत असा प्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला होता. त्यामुळे राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता. आज अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात पहिले राफेल दाखल झाले आहे. डेप्युटी एअर फोर्स चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी तासभर या विमानातून उड्डाण केले अशीही माहिती समजते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 8:52 pm

Web Title: iaf received its first acceptance rafale combat aircraft from dassault aviation in france yesterday scj 81
Next Stories
1 राफेल फायटर उडवण्याचा आनंद मर्सिडिझ चालवण्यासारखाच – हवाई दल प्रमुख
2 युपीत NRC ची अंमलबजावणी केली तर आधी आदित्यनाथांनाच राज्य सोडावं लागेल – अखिलेश यादव
3 ट्विटरने हजारो फेक न्यूज अकाऊंट्स केली बंद
Just Now!
X