News Flash

आयएएस व इतर सनदी अधिकाऱ्यांतील वाद आता सातव्या वेतन आयोगाकडे

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या वादाला आता अधिकृत रूप मिळाले आहे.

वीस मुलकी सेवा अधिकाऱ्यांच्या महासंघाने सातव्या वेतन आयोगाकडे याचिका दाखल केली असून जातीच्या आधारे भेदभाव केला जात असल्याचा व आयएएस तसेच इतर सेवा यांच्यात समानता नसल्याचा आरोप केला आहे.
सातव्या वेतन आयोगाकडे दाखल केलेल्या याचिका अर्जात संघटनेने म्हटले आहे की, आयएएस अधिकाऱ्यांचा नेहमीच वरचष्मा राहतो हे बरोबर नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या वादाला आता अधिकृत रूप मिळाले आहे. आयएएस अधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान मिळते याबाबत तर दुमत नाहीच पण कुठल्याही पदाची आव्हाने व इतर बाबी यात तफावत असल्याचेही मात्र मान्य करता येणार नाही. पण या सर्व सेवांमध्ये समानता नाही. अनेकदा दुजाभाव केला जातो, असे मुलकी सेवा संघटना महासंघाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2015 12:02 am

Web Title: ias and other civil officer disputes now at the seventh pay commission
टॅग : Ias
Next Stories
1 बिहारमधील पराभवाला भागवतांचे वक्तव्य कारणीभूत नाही- अरुण जेटली
2 कामाऐवजी फक्त बडबड करत राहिल्यास बिहारसारखी गत होते- केजरीवाल
3 …म्हणून संसदेचे कामकाज रोखण्याचा विचार करू नका – नायडूंचा विरोधकांना इशारा
Just Now!
X