23 November 2020

News Flash

IAS अधिकारी टिना डाबी आणि अथर खान विभक्त होणार, घटस्फोटासाठी अर्ज दाखल

२०१८ साली टिना आणि अथर अडकले होते विवाहबंधनात

२०१५ साली UPSC परीक्षेत देशातून अव्वल आलेल्या टिना डाबी आणि त्याच वर्षात दुसरा क्रमांक पटकावलेला तिचा पती अथर खान विभक्त होणार आहे. दोघांनीही परस्परांच्या संमतीने जोधपूर कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. २०१८ साली टिना डाबी आणि अथर खान विवाहबंधनात अडकले होते.

राजस्थान कॅडरच्या आयएस अधिकारी असलेल्या टिना आणि अथर खान हे आपल्या ट्रेनिंगदरम्यान एकत्र आले. दोघांच्याही मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. टिना आणि अथर यांचं लग्न हे काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय ठरलं होतं. लग्नानंतर काही दिवसांमध्येच टिनाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन खान हे आडनाव काढून टाकलं आणि चर्चांना उधाण आलं.

अथरनेही काही दिवसांनी टिनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर चर्चांचं अधिकच पेव फुटलं होतं. टिना आणि अथर यांचं लग्न भारतात राजकीय मुद्दाही बनला होता. हिंदु महासभेने टिना आणि अथर यांचा विवाह लव जिहाद ठरवत टीका केली होती. यानंतर दोघांमध्ये पटत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेरीस दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:09 pm

Web Title: ias toppers tina dabi athar khan file for divorce in jaipurs family court psd 91
Next Stories
1 २६/११ सारख्या हल्ल्याच्या उद्देशाने आले होते चार दहशतवादी, मोदींनी घेतलं पाकिस्तानचं नाव
2 उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरोधात योगी सरकारचा कडक कायदा येणार
3 ….तर तेजस्वी यादव यांनी देखील राजीनामा द्यावा; जदयूचा पलटवार
Just Now!
X