पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून जम्मू-काश्मीरमधील सांबा येथील लष्करी तळाप्रमाणेच दिल्लीतही ‘फिदायीन’ (आत्मघातकी) हल्ला होऊ शकतो, असा खबरदारीचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे.
अलीकडेच सांबा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या तपासादरम्यान, जैशच्या दिल्लीत दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सुगावा लागला, असे गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना कळवले आहे. सांबाप्रमाणेच हा हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे कुठलेही अघटित टाळण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारीचे आणि प्रतिबंधक उपाययोजना करावी, असे यंत्रणांनी म्हटले आहे.