इशरत जहाँ हिला दहशतवादी म्हणून घोषित करण्याची शक्कल गुप्तचर विभागाचे (आयबी) माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांची होती. त्यांच्याच प्रेरणेने गृह मंत्रालयाने तसे प्रतिज्ञापत्र दिले होते, असे केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) आपल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
इशरत जहाँ चकमक प्रकरणी पुरवणी आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे की, इशरतजहाँ ही दहशतवादी असल्याचे रािजदर कुमार यांनीच गृह खात्याच्या गळी उतरवले आणि नंतर चकमकीत तिच्यासह तीन जणांना ठार करण्यात आले. ती चकमक खरी दाखवण्याचा प्रयत्न केला. इशरतजहाँ ही मुंबईची रहिवासी होती. त्यावेळचे गृह मंत्रालयातील उपसचिव आर.व्ही.एस. मणी यांनी गुजरात उच्च न्यायालयात दोन महिन्याच्या अंतराने दोन प्रतिज्ञापत्रे सादर करून इशरतबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली होती. ६ ऑगस्ट २००९ च्या प्रतिज्ञापत्रात  इशरत व इतर तिघे अतिरेकी असल्याचे म्हटले होते, तर ३० सप्टेंबर २००९ रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मणी यांनी इशरत जहांॅ ही दहशतवादी होती याचे ठोस पुरावे नसल्याचे म्हटले होते.

या आरोपावर मी काही प्रतिक्रिया
देऊ इच्छित नाही. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी या आरोपांना उत्तर देईन. गुप्तवार्ता गोळा करण्याची कृती ही गुन्हेगारी असू शकत नाही. मी आणि माझे सहकारी यांनी गुप्तवार्ता सरकारकडे देऊन कुठलेही गुन्हेगारी कृत्य केलेले नाही.
– राजिंदर कुमार