बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाचं वृत्त आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने (IBPS)विशेष अधिकारी (स्पेशलिस्ट ऑफिसर, SO)पदाच्या एकूण 1,163 जागांसाठी भरती जाहीर केलीये. यामध्ये, कृषी क्षेत्र अधिकारी(स्केल- I), आयटी अधिकारी (स्केल- I),कायदा अधिकारी (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I),आणि मानव संसाधन / वैयक्तिक अधिकारी (स्केल- I) या पदांचा समावेश आहे.

यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला 6 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. 26 नोव्हेंबर अर्ज करण्याची अखेरती तारीख आहे. आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरुन इच्छुकांना अर्ज करता येईल. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात 28 आणि 29 डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होईल. याचा निकाल जानेवारीमध्ये येईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्यानंतर अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखत घेतली जाईल. अशाप्रकारे उमेदवाराची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचं वय २० ते ३० च्या दरम्यान असावं. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परिणामी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (ibps.in)असेलेले नोटीफीकेशन पाहूनच अर्ज करावा.