News Flash

प्राण्यांसाठी थंडा थंडा कूल कूल ट्रीट

रोममधले तापमान उन्हाळ्यात वाढलं की इथल्या संग्रहालयातील प्राण्यांना बर्फामध्ये गोठवलेली फळे आणि मांस दिले जाते.

रणरणत्या उन्हात गारेगार बर्फाचा गोळा मिळाला की जीवाला किती बरे वाटते. आता हाच उपाय रोममधल्या एका प्राणी संग्रहालयात राबवला जातोय. तो सुद्धा उन्हानं बेजार झालेल्या माणसांसाठी नाही तर इथल्या प्राण्यांसाठी. काय तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल ना! पण हे खरे आहे. रोममधल्या एका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना फळं आणि मांस असलेले बर्फाचे गोळे खायला दिले जात आहेत. प्राणीसंग्राहलयातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात वाघ, अस्वल, माकड यासारखे प्राणी बर्फाचे गोळे खाताना दिसत आहेत.
सध्या रोममध्ये सूर्य़ आग ओकतोय. इथला पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. उष्णतेच्या लाटेने रोमवासी जसे त्रस्त आहेत तसेच प्राणी देखील त्रस्त झालेत. माणूस एकवेळ पंखा किंवा एसीची हवा खाऊन शांततरी बसेल पण या पिंजऱ्यातला मुक्या प्राण्यांनी काय करावं? म्हणूनच यांच्यासाठी ही गारेगार मेजवानीच आहे.
रोममधले तापमान उन्हाळ्यात वाढलं की इथल्या प्राण्यांना बर्फामध्ये गोठवलेली फळे आणि मांस दिले जाते. यामुळे या प्राण्यांना थंडावा मिळतो अस इथल्या कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:11 pm

Web Title: ice treat for zoo animals
Next Stories
1 Syed Akbaruddin: संयुक्त राष्ट्रसंघातील सभेत भारताच्या सय्यद अकबरूद्दीन यांनी काढली पाकची खरडपट्टी
2 Pink boom : म्हशीच्या मांसाची निर्यात वाढल्याने भारताच्या दुग्धउत्पादनात घट होण्याची शक्यता
3 झाकीर नाईकची हत्या करणाऱ्या ५० लाखांचे बक्षिस, साध्वी प्राची यांचे प्रक्षोभक आवाहन
Just Now!
X