आयसीआयसीआय बँकेचं मुख्यालय गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआय बँकेने मुंबई शेअर बाजाराला व राष्ट्रीय शेअर बाजाराला हे कळवलं आहे. बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असल्याने, कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

आयसीआयसीआय बँकेने या संदर्भातला जो प्रस्ताव RBI कडे पाठवला होता त्या प्रस्तावाला आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC दिलं आहे. बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी ज्या औपचारिकता आणि निर्देशांचं पालन करावं लागतं ते केलं जावं असं RBI ने स्पष्ट केलं आहे.