News Flash

उत्तराखंडमधील बचावकार्यासाठी आयसीआयसीआयची १५ कोटींची मदत

'उत्तराखंड मुख्यमंत्री बचावकार्य निधी'मध्ये आयसीआयसीआय समूहातर्फे १५ कोटी रुपयांचे मदत देण्यात आली आहे.

| July 24, 2013 04:05 am

‘उत्तराखंड मुख्यमंत्री बचावकार्य निधी’मध्ये आयसीआयसीआय समूहातर्फे १५ कोटी रुपयांचे मदत देण्यात आली आहे.  आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १५ कोटी रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
 चंदा कोचर म्हणाल्या, उत्तराखंडातील प्रलयात अडकलेल्यांचे कुटुंबीय आणि घरापासून दुरावलेल्या जनतेबद्दल मला सहानुभूती असून, मी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या प्रलयात अद्याप अडकलेल्या लोकांसाठी आणि उत्तराखंडमधील पुनर्बांधणी आणि पुनर्रचनेच्या कामासाठी देशभरातून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रबांधणीच्या कार्यात, गरजूंना मदत करण्यासाठीच्या केंद्रीय आणि राज्य शासनाच्या यंत्रणांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
 या देणगीत आयसीआयसीआय आणि तिच्या सलग्न कंपन्या तथा संस्थांबरोबर आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचा-यांनी देखील योगदान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 4:05 am

Web Title: icici donates rs 15 cr to uttarakhand
टॅग : Flood
Next Stories
1 ‘कॅग’च्या नियुक्तीला आव्हान देणाऱया याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल
2 काश्मिरमध्ये मौलवीच्या घरावरील हल्ल्यात दोन लहानग्यांचा मृत्यू
3 देशातील दारिद्रय़ ३७ टक्क्य़ांवरून २१ टक्क्य़ांवर
Just Now!
X