27 January 2021

News Flash

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती

आयसीएमआरकडून अभ्यासातील निष्कर्षांचा हवाला

करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.

आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

या उपचार पद्धतीला अलीकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही प्रयोग- पाहणीच्या तत्त्वावर मान्यता दिली आहे. यात विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अ‍ॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 5:44 pm

Web Title: icmr exclude plasma therapy from national clinical protocol on covid bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 शोपियां पाठोपाठ पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा
2 …आता मोदींच्या नेतृत्वात देशभरात केवळ एकच नारा – योगी आदित्यनाथ
3 राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस
Just Now!
X