News Flash

…म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना फटका बसतोय; ICMR ने सांगितलं कारण

"तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढलं आहे"

प्रातिनिधिक (PTI)

करोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं दिसत असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचं कारण सांगितलं आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

तरुणांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं की, “पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचं दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात”.

आणखी वाचा- देशात मृत्यूची त्सुनामी; २४ तासांत करोनाबळींचा नवा उच्चांक

“तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे, कारण अचानक त्यांना घऱाबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात करोनाच्या विषाणूचा नवा प्रकार आढळत असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो,” असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान १६ राज्यांमध्ये ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब यांचा समावेश आहे तिथे रुग्णसंख्या वाढत असतानाही देशात मात्र सध्या करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसत असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

आणखी वाचा- कोवॅक्सिन लसीची २-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा हे त्या १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आहेत जिथे दैनंदिन रुग्णसंख्येत सतत वाढ किंवा घट होत आहे. दरम्यान १६ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. पंजाब, आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 8:48 am

Web Title: icmr on why covid 19 second wave affecting young people sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनाच्या परिणामांचा अंदाज बांधण्यात सरकार अपयशी!
2 गोव्यात शासकीय रुग्णालयात २६ करोनाबाधितांचा मृत्यू
3 पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द
Just Now!
X