ICSE दहावी आणि ISC बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ३ वाजता https://www.cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. पहिल्यांदाच परीक्षा न घेता दहावी बारावीचा निकाल लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निकाल कधी लागणार?, याबाबत विचारणा केली जात होती. त्यानंतर आता उद्या निकाल लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निकाल कुठे आणि कसा पाहाल
१) www.cisce.org आणि www.results.cisce.org या दोन संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. होम पेजवर ‘Results 2021’ यावर टॅप केल्यानंतर ICSE/ISC Year 2021 असे दोन पर्याय दिसतील. त्यानुसार त्यावर क्लिक करा. परीक्षार्थीला त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स क्रमांक आणि स्क्रिनवर आलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. त्यानंतर निकाल दिसेल. त्यानंतर त्याखाली डाउनलोडचा पर्याय असेल तिथून निकाल डाउनलोड करता येईल.

indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
IIIT Nagpur job hiring news marathi
IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती

२) एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. परीक्षार्थीला निकालासाठी त्याचा युनिक आयडी टाकून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तात्काळ रिझल्ट दिसणार आहे.

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्जामिनेशन (सीआयएससीई) ने दहावी, बारावीच्या निकालाबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. करोनामुळे यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तसेच अंतर्गत मूल्यांकनावरून निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बोर्ड नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर निकाल जारी करणार आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर आधारित असणार आहे.