News Flash

शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात

मॅकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.

मॅकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.

अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.

छायाचित्र सौजन्य: कॉन हॉल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:29 am

Web Title: idol of annapurna stolen a hundred years ago will soon be in india abn 97
Next Stories
1 करोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीचे मोदी यांचे जागतिक नेत्यांना आवाहन
2 ..म्हणून खासगी रुग्णालयांकडून भरमसाट शुल्कआकारणी
3 देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर
Just Now!
X