05 March 2021

News Flash

सैन्याचं मोठं यश! एकाचवेळी जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जैशचा IED एक्सपर्ट आणि ऑपरेशनल कमांडर ठार

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी बुधवारी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर आहे. अलीकडेच पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली. त्या कटामध्ये हा ऑपरेशनल कमांडर सहभागी असल्याची दाट शक्यता आहे.

आज सकाळी पहाटेच्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. एकाचवेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. सैन्य दलाच्या कारवाईत ठार झालेला जैशचा कमांडर मागच्या आठवडयात पुलवामात राजपोरामध्ये एका कार स्फोटाच्या कटात सहभागी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैशचा दहशतवादी आयईडी एक्सपर्ट आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- जैशच्या बॉम्ब एक्सपर्टचा खात्मा, पण अजूनही पुलवामा सारख्या मोठया हल्ल्याचा धोका कारण…

“गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्या आधारावर आज सकाळी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. सापळा रचून दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले” असे लष्कराने म्हटले आहे. पुलवामामधील एका गावातून अलीकडेच स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त करण्यात आली होती. त्या कटामध्ये सुद्धा हा दहशतवादी सहभागी होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 1:32 pm

Web Title: ied expert and jaish commander killed in encounter dmp 82
Next Stories
1 रुग्णसंख्या दोन लाखांवर, भारतात करोनाच्या महासाथीने शिखर गाठलं आहे का? ICMR म्हणतं…
2 Corona: अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाकडून दगडफेक, मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडून कुटुंबीयांनी काढला पळ
3 संरक्षणासाठी कोर्टात गेलं जोडपं; विवाहावेळी मास्क घातला नाही म्हणून झाला १० हजारांचा दंड
Just Now!
X