05 April 2020

News Flash

“मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री”

अशा स्त्रीच्या हातचे जेवण करणारा माणूस पुढील जन्मी बैल होईल असंही त्यांनी म्हटलं आहे

Swami Krushnaswarup Dasji

मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा येईल असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केलं आहे. भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत. एवढंच नाही तर मासिक पाळीच्या काळात जी स्त्री स्वयंपाक करते आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल असंही वक्तव्य कृष्णस्वरुप दासजी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. ‘अहमदाबाद मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हणाले कृष्णस्वरुप दासजी ?
“ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत”
” मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसं? ” असंही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 6:11 pm

Web Title: if menstruating women cook they will born as bitch in next life says swami krushnaswarup dasji scj 81
Next Stories
1 S-400 सिस्टिम वेळेत देण्याचा रशियाचा शब्द, संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या घरात
2 ‘…तर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ’
3 “मुस्लीम कब्रस्तानाच्या जागी राम मंदीर बांधणं उचित आहे का?”
Just Now!
X