News Flash

राहुल गांधी नीट पक्ष सांभाळू शकत नसतील तर, देश काय चालवणार? : रामदास आठवले

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांना सुनावले

केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि निर्माण करत टीका देखील केली आहे.

आठवले यांनी म्हटले की, पाच वर्षे चांगले काम करूनही काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच, यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना म्हटले की, जर राहुल गांधी आपला पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा चालवतील? म्हणूनच त्यांचा अमेठीतून पराभव झाला.

या अगोदर शनिवारी आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि अन्य पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील म्हटले होते की, भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 8:09 pm

Web Title: if rahul gandhi cannot manage his party well how would he govern the country ramdas athawale msr 87
Next Stories
1 #Howdy Modi : जाणुन घ्या, भावूक झालेल्या काश्मिरी पंडितांनी कसे केले पंतप्रधान मोदींचे स्वागत
2 अलकायदाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन एटीएसच्या ताब्यात
3 कलम ३७० हे कर्करोगाच्या जखमेप्रमाणे होते, यामुळे काश्मीरमध्ये रक्तपात झाला : संरक्षणमंत्री
Just Now!
X