News Flash

विरोधक सत्तेत आल्यास रोज नवा पंतप्रधान- अमित शहा

विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविता येत नसल्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविता येत नसल्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली आहे. त्यामुळे महाआघाडी जर सत्तेत आली तर आठवडय़ात रोज नवा पंतप्रधान दिसेल, अशी टीका शहा यांनी केली.

लखनौ व कानपूर येथे बुथपातळीवरील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी विरोधकांच्या आघाडीला लक्ष्य केले. ही महाआघाडी झाली तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश यादव, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा व स्टॅलीन शनिवारी पंतप्रधान होतील व रविवार सुटीचा असेल, असा टोला शहा यांनी लगावला. विरोधकांची आघाडी घराणेशाहीसाठी आहे, तर आम्हाला देश घडवायचा आहे, असे शहा यांनी सांगितले. मोदींच्या नेतृत्वात भक्कम सरकार गरजेचे आहे, असे शहा यांनी लखनौ येथे स्पष्ट केले. रामजन्मभूमीचा मुद्दा उपस्थित करण्याचा कोणत्याही काँग्रेस नेत्याला अधिकार नाही. भाजप मंदिर उभारणीस वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:43 am

Web Title: if the opposition comes to power the new prime minister amit shah
Next Stories
1 नोटाबंदी, रेरा कायद्यामुळे युवकांचे घराचे स्वप्न साकार – पंतप्रधान मोदी
2 ‘युवकांची माथी भडकावण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर’
3 आवर्ती सारणीच्या दीडशे वर्षांनिमित्त वर्षभर उत्सव
Just Now!
X