News Flash

पुलवामा हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल : सपा नेता

मतांसाठी हा सगळा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर उत्तर प्रदेशातील समाजवादी नेते आर. जी. यादव यांनी मोठे भाष्य केले आहे. या हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.


यादव म्हणाले, मतांसाठी पुलवामात जवानांवर हल्ला घडवून आणण्यात आला, त्यामुळे अर्धसैनिक दले सरकारवर नाराज आहेत. जवानांना घेऊन इतका मोठा ताफा महामार्गावरुन जात असताना जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. तसेच या जवानांना साध्या बस मधून रवाना केले जात होते. त्यामुळे हा सगळा कट होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, या कटात कोण सामिल होतं हे मी आत्ता सांगू इच्छित नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा बड्या नेत्यांची पोलखोल होईल, असे यादव यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याने या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:51 pm

Web Title: if the pulwama attack is investigated then the leaders will be get stuck says sp leader
Next Stories
1 धक्कादायक ! विकृताचा कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार, घटना सीसीटीव्हीत कैद
2 भारत-पाकने चर्चा करुन तोडगा काढावा, चीनच्या नेतृत्वाखालील SCO चा सल्ला
3 पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, सैन्यातील जवान शहीद
Just Now!
X