News Flash

लस न घेतल्यास सिमकार्ड होणार बंद! ‘या’ देशाने घेतला निर्णय

करोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे

सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे

करोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबता अजूनही अनेक नागरीकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दुर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे.

डॉ. रशीद म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे करोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लशीचा पहिला डोस घेणऱ्या ४ ते ५ लाख लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला नाही. पाकिस्तानमध्ये २ फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमसुरू झाली आहे.

हेही वाचा- पाकिस्तानने चीनच्या मदतीने बनवली ‘PakVac’ करोना लस

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांनी लस घेतली नाही. तसेच ज्यांनी लशीसाठी नोंदणी देखील केली नाही. पहिल्या टप्प्यात त्यांना आधी इशारा देण्यात येईल. त्यानंतर अशा लोकांना करोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी आणि लस घेण्यासाठी वेळ निश्चित केली जाईल. पुढील टप्प्यात, उल्लंघन करणार्‍यांच्या ओळखपत्रांशी जोडलेली सिम कार्ड बंद केली जातील. लस घेतल्यानंतर सिमकार्ड पुन्हा सुरु केले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:06 pm

Web Title: if you dont get vaccinated your sim card will be blocked this country decided srk 94
Next Stories
1 हनीमूनच्या रात्रीच आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयाने माहिती दिल्यानंतर पोलीस चौकशी सुरु
2 प्रभु रामाच्या जन्माच्या विधानानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा ‘योगा’वर दावा
3 देशात ९१ दिवसानंतर आढळले ५० हजारापेक्षा कमी करोना रुग्ण
Just Now!
X