News Flash

‘माझ्या प्रेयसीशी लग्न केलंस तर मंडपात गोळ्या झाडेन’

तू ज्या मुलीशी लग्न करत आहे, ती माझी प्रेयसी असल्याचे त्याने सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र

जर माझ्या प्रेयसीशी लग्न केलंस तर मंडपातच गोळ्या झाडून तुझी हत्या करेन अशा धमकीचा फोन दादरी (उत्तर प्रदेश) येथील एका युवकाला आला आहे. नवादा गावातील मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी मंगळवारी दनकौर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कारवाईही सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवादा गावातील एका व्यक्तीने दादरी येथील एका युवकाशी आपल्या मुलीचे सहा महिन्यांपूर्वी लग्न ठरवले. सुमारे १५ दिवसांपूर्वी नियोजित वराला अज्ञात व्यक्तीने फोन केला. तू ज्या मुलीशी लग्न करत आहे, ती माझी प्रेयसी असल्याचे त्याने सांगितले. प्रथम त्या युवकाला कोणीतरी मस्करी करत असल्याचे वाटले.

युवतीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तीन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच क्रमांकावरून फोन आला आणि पुन्हा धमकी देण्यात आली. जर माझ्या प्रेयसीशी लग्न केले तर मंडपातच तुझी गोळ्या झाडून हत्या करू, अशी धमकी समोरच्या व्यक्तीने दिली. या फोननंतर वर पक्षाकडील सर्वजण घाबरल्याचे मुलीच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी अज्ञाताविरोधात दनकौर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीडित कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. फोन क्रमांकावरून संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरच अटक केली जाईल, असे दनकौर पोलीस ठाण्याचे अधिकारी सत्पाल सिंह यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 3:17 pm

Web Title: if you marry with my girlfriend i will shoot you in marriage ceremony man threatens
Next Stories
1 #LoksattaPoll: प्रियंका-राहुल यांची जोडी मोदी-शाह जोडीला टक्कर देईल असं वाटतं का?
2 प्रियंकाचा राज्याभिषेक म्हणजे राहुलच्या अपयशावर शिक्कामोर्तब – भाजपा
3 प्रियंका गांधी काँग्रेसचा निवडणुकीतील चेहरा, महासचिवपदी नियुक्ती
Just Now!
X