News Flash

Devyani Khobragde: देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती

परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाल्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.

Devyani Khobragde : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

भारताच्या अमेरिकेतील माजी वादग्रस्त राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची गुरूवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परराष्ट्र सेवेत अधिकारी राहिलेल्या देवयानी खोब्रागडे यांना तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत भारतीय नोकराचे आर्थिक शोषण आणि व्हिसा घोटाळा प्रकरणात अटक झाल्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. अमेरिकतील भारताच्या वाणिज्यदूतवासातील उच्च-उपायुक्तपदावर असताना अटक केल्यानंतर त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीचा त्यावेळी सत्तेवर असलेल्या तत्कालिन काँग्रेस सरकार आणि विरोधात असलेल्या भाजप दोघांनीही निषेध केला होता. या प्रकरणामुळे भारत-अमेरिकेतील संबंधही ताणले गेले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी खोब्रागडे यांच्या भेटीसाठी थेट बराक ओबामा यांची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

देवयानी खोब्रागडे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह 
हकालपट्टी झालेल्या राजनैतिक अधिकाऱ्याच्या वक्तव्याशी संबंध नाही 
हे तर कारस्थान! 
देवयानींच्या गळ्यात रिपाइंचा झेंडा 
देवयानी यांच्या झडतीची चित्रफीत बनावट – हार्फ 
रामदास आठवले ओबामांची भेट घेणार 
जशास तसे उत्तर.. ; खोब्रागडे अटकप्रकरणी केंद्र सरकार आक्रमक 
देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत अटक 
मोलकरणीला ‘राबवणे’ भोवले! 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:29 pm

Web Title: ifs officer devyani khobragde appointed as ps to ramdas athawale mos
Next Stories
1 Kashmir protests: छऱ्याच्या गोळ्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत झालेल्या जखमींना विमानाने दिल्लीत आणणार
2 Hafiz Saeed: … तर काश्मीर पाकिस्तानचा होईल, हाफिज सईदने ओकली गरळ
3 शीख तरुणाला ‘विम्बल्डन’च्या रांगेतून बाहेर काढले
Just Now!
X