‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’च्या वैज्ञानिकांचे संशोधन

बंगळुरू : हेलियमच्या महाद्रायुत (सुपरफ्लुईड) प्रथमच दोन वेगळे गुणधर्म असलेल्या बुडबडयांचे अस्तित्व दिसून आले आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतील वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की यातून इलेक्ट्रॉनच्या विद्युत स्थितीचा अभ्यास करणे शक्य असून त्याचा इतर रासायनिक घटकांशी काय अभिक्रिया होते याचाही अभ्यास करावा लागणार आहे.

भौतिकशास्त्र विभागाच्या पीएच.म्डी विद्यार्थी नेहा यादव, प्रा. प्रोसनेजित सेन , अंबरिश घोष यांनी हे संशोधन केले आहे.

हे संशोधन सायन्स अ‍ॅडव्हान्सेसमध्ये प्रसिद्ध झाले असून हेलियमच्या महाद्रायुत जर इलेक्ट्रॉन सोडला तर सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन बुडबुडा तयार होतो, जी खोबण हेलियमच्या अणूत दिसून येते त्यात एकच इलेक्ट्रॉन दिसून येतो. इलेक्ट्रॉन बुडबुडय़ाचा आकार  इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा स्थितीवर अवलंबून असतो. जर बुम्डबुडा घनगोलाकारासारखा असेल तर इलेक्ट्रॉनची विद्युत अवस्था ‘वन एस’ असते. या बुडबुडय़ांमुळे द्रव हेलियममध्ये अगदी सूक्ष्म बुडबुडे दिसून येतात.

वैज्ञानिकांनी या बुडबुडय़ांचे अस्तित्व सैद्धांतिक पातळीवर मांडले आहे. आम्ही प्रायोगिक पातळीवर हे बुडबुडे प्रथम अनुभवले आहेत, असे नेहा यादव यांनी म्हटले आहे.

हेलियम हा असा घटक आहे ज्यात उष्णता जेवढीच्या तेवढय़ा प्रमाणात वाहून नेली जाते. कुठलाही प्रतिरोध त्यात नसतो.  द्रायू स्वरूपाच्या हेलियममधून उष्णतेचे वहन होत असताना व्होरटायसेसची अभिक्रिया कशी होते यावर प्रकाश पडणार आहे. या इलेक्ट्रॉन बुम्डबुडय़ांचा वापर पुढे पुंज भौतिकीत होऊ शकतो. त्यातून नव्या मापन प्रक्रिया तयार करता येऊ शकतात. अशा बुडबुडय़ांचे आणखी काही प्रकार आहेत काय यावर  विचार करीत असल्याचे घोष  म्हणाले.

संरचनेच्या शोधाला चालना

एखाद्या  द्रव्यामध्ये जेव्हा आंतरक्रियेसाठी जेव्हा काही मर्यादित इलेक्ट्रॉन असतील तर नेमके काय घडून येते हे या संशोधनातून दिसून येणार आहे. काही मऊ पदार्थांमध्ये इलेक्ट्रॉन व इतर संरचनेची घडण कशी झालेली असते याचा शोध घेणेही सोपे होणार आहे.