नोकरी मेळ्याचा पहिला टप्पा संपला असून त्यात आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांना इतर आयआयटीच्या तुलनेत जास्त प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या आहेत.
पहिल्या टप्प्यातील नोकरी मेळे शनिवारी संपले व त्यात ११०० नोकऱ्यांचे देकार होते त्यात १०५० युवकांना नोकऱ्या मिळाल्या. शैक्षणिक संस्था व सरकारी संस्था आयआयटीच्या विद्यार्थ्यांना फारशा नोकऱ्या देत नसतानाही  यावेळी आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांना २०० विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. एकूण २७५ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. जानेवारीतील नोकरी मेळ्यासाठी दुसऱ्या टप्प्यात ५० कंपन्या येत आहेत. शेल, आयटीसी, शुल्मबर्गर, गोल्डमन सॅश, हिंदुस्थान युनिलिव्हर व क्रेडिट सुसी, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल या कंपन्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत. पार्थियन समूह, बेकर ह्य़ूजेस, व्हिसा, टीएसएमसी यांनी अनेक संस्थांना भेटी दिल्या. त्यातील एका कंपनीने दहापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. आयआयटी खरगपूरचे उपाध्यक्ष पुंज राजन यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचा हा चांगुलपणा आहे. त्यांच्यामुळे या कंपन्या येथे आल्या व त्यांनी विद्यार्थ्यांना संधी दिली.
रॉबर्ट बॉश, झेडएस असोसिएटस, केपगेमिनी, इएक्सएल, फ्लिपकार्ट, कॉगनिझंट या कंपन्यांनी जास्तीत जास्त युवकांना संधी दिली आहे. हाउसिंग कॉमनफ्लोअर, मेरू कॅबस, स्नॅपडील, स्टेढीला, ओवायओ रूम्स या कंपन्यांनीही सॉफ्टवेअर व इतर कामात युवकांना संधी दिली आहे.
करीयर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख सुधीरकुमार बराई यांनी सांगितले की, मोठय़ा पॅकेजेसबाबत मोठय़ा प्रमाणात उत्सुकता होती. मुलांना करीअरच्या आशा होत्या. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता विद्यार्थीसंख्याही वाढली आहे. युवक त्यांच्या पे पॅकेजपेक्षा आवडीच्या क्षेत्रात निवड होण्याकडे लक्ष पुरवित आहेत.

वैशिष्टय़े
*मुलांचा पे पॅकेजपेक्षा आवडत्या क्षेत्राकडे ओढा
*२०० कंपन्यांचा सहभाग
*जानेवारीत ५० कंपन्या येणार
*पहिल्या फेरीत १०५० युवकांना नोकऱ्या