मद्रास आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या नागेंद्रकुमार रेड्डी या विद्यार्थ्यांने वसतिगृहातील आपल्या खोलीत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. नागेंद्रकुमार हा एम.टेक्.चा अभ्यास करीत होता.नागेंद्रकुमार याने मृत्यूपूर्वी काहीही चिठी न ठेवल्यामुळे या घटनेमागचे कारण समजू शकले नाही; परंतु तरीही पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. नागेंद्रकुमार हा मूळचा आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्य़ात राहणारा होता. अलीकडेच गणेशचतुर्थी साजरी करून तो वसतिगृहात परतला होता. नागेंद्रकुमार याच्या निधनाबद्दल मद्रास आयआयटीने दु:ख व्यक्त केले असून पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे संचालक एम. भास्कर राममूर्ती यांनी सांगितले. त्याच्या मृत्यूमागे कोणतेही कारण दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.