26 November 2020

News Flash

तुरूंगात असलेल्या भावाच्या पत्नीशी ठेवले शारीरिक संबंध, नंतर…

दोन महिन्यांपासून पोलीस घेत होते आरोपीचा शोध

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये एका तरुणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी खाक्या दम भरताच आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची कबूली दिली. महत्त्वाचं म्हणजे अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं.

उत्तर प्रदेशातील चंदौली पोलीस ठाणे हद्दीत धुरी कोट हे गाव आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील राकेश रोशन नावाच्या तरुणांचा मृतदेह आढळला होता. या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दोन महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, हाती काहीच लागत नव्हते. याच दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी एका चकमकीत आशुतोष यादव नावाच्या आरोपीला अटक केली.

आशुतोष यादवने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची पोलीस चौकशीत माहिती दिली. राकेश रोशनच्या हत्येमध्ये सहभागी असल्याची कबूलीही आशुतोषने दिली. राकेशची हत्या त्याचा लहान भाऊ मुकेश यादवने केल्याची माहिती आरोपीने दिली. आशुतोषने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मुकेश यादव याला ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली देत कारणाचाही खुलासा केला.

पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या रागातून मोठ्या भावाची हत्या केल्याचं मुकेशने पोलिसांना सांगितलं. एका हत्या प्रकरणात मुकेश यादव तीन वर्ष तुरुंगात होता. याच काळात मुकेशची पत्नी आणि राकेश रोशन या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

काही महिन्यांपूर्वी मुकेश जमानतीवर तुरूंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती कळाली. त्याच्या मोठ्या भावानेच पत्नीशी संबंध ठेवल्याचा मुकेशला राग आला. याच काळात मुकेशचा तुरूंगात मित्र झालेला आशुतोष जमानतीवर बाहेर आला. मुकेशने सगळा प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर आशुतोष यादवला सोबत घेऊन मुकेश यादवने मोठ्या भावाच्या हत्येचा कट रचला.

मुकेश यादव मित्र आशुतोष यादव आणि आणखी एकासोबत मोठा भाऊ राकेशला दारू पिण्यासाठी सीवानला घेऊन गेला. त्याच वेळी मुकेशने राकेशची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांना कोणतीही माहिती हाती लागत नव्हती. मात्र, ५० हजाराचा बक्षीस असलेल्या आरोपी आशुतोष याला अटक केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 3:36 pm

Web Title: illicit relationship with younger brother wife murdered chandauli bmh 90
Next Stories
1 ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर
2 इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केलेलं पत्र स्वामींनी केलं ट्विट, म्हणाले…
3 VIDEO: अमेरिका भारताला ‘ते’ शक्तीशाली विमान देईल?
Just Now!
X