इमामाच्या पत्नीवर कुटुंबातील सदस्यानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील धानदेडा गावात रविवारी ही घटना घडली. पीडित महिलेवर दीरानेच बलात्कार केला. पीडित महिलेचा पती दिल्लीतील मशिदीमध्ये इमाम आहे. या महिलेचे दुर्देव म्हणजे बलात्कारानंतर नवऱ्याने आरोपीला धडा शिकवण्यासाठी साथ देण्याऐवजी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली असे पोलिसांनी सांगितले.
मैनउद्दीन असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी पीडित महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्यावेळी पीडित महिलेचा पती घरात नव्हता. तिने आरोपी मैनउद्दीनला विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.
या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पीडित महिलेच्या भावाने नोंदवलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मागच्यावर्षीच या महिलेचे लग्न झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 4:41 pm