19 September 2020

News Flash

रघुराम राजननंतर आणखी एक भारतीय आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी

रघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लागली आहे.

रघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लागली आहे. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गीता यांची निवड केली आहे. सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत. मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 10:47 pm

Web Title: imf appoints geeta gopinath as chief economist
Next Stories
1 ‘नानांवरील आरोप बिनबुडाचे, बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तनुश्रीने हा खटाटोप केलाय’
2 खुशखबर! आता UPSC चा अर्ज मागे घेता येणार
3 भारताची न्यायव्यवस्था जगामध्ये सर्वात मजबूत – दीपक मिश्रा
Just Now!
X