News Flash

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांकडे महत्त्वाची खाती

११ दिवसांनंतर मध्य प्रदेश मंत्र्यांचे खातेवाटप

भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे. (संग्रहित छायाचित्र)

 

समर्थकांना चांगली खाती मिळावीत म्हणून ज्योतिरादित्य शिंदे हे आग्रही असतानाच, भाजपमध्ये महत्त्वाची खाती जुन्या काँग्रेसजनांना देण्यास झालेल्या विरोधामुळे रखडलेले मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर ११ दिवसांनी करण्यात आले.

महसूल, आरोग्य, ऊर्जा, जलसंपदा सारखी महत्त्वाची खाती शिंदे समर्थकांच्या वाटय़ाला आली आहेत. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार २ तारखेला करण्यात आला होता. खातेवाटपावरून बरीच चढाओढ होती. आपल्या समर्थकांना चांगली खाती मिळावीत, असा ज्योतिरादित्य शिंदे यांचा आग्रह होता.

दुसरीकडे भाजप नेत्यांनाही चांगली खाती हवी होती. यातून ११ दिवस खातेवाटपाचा घोळ सुरू होता. ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे खातेवाटप व्हावे, अशी भूमिका दिल्लीतील भाजप नेत्यांनी घेतली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून सोमवारी अखेर खातेवाटप जाहीर केले.

महसूल, परिवहन, ऊर्जा, जलसंपदा, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, खाण अशी महत्त्वाची खाती शिंदे यांच्या समर्थकांना मिळाली आहेत.

गृह, वित्त व नगरविकास ही खाती मूळ भाजप नेत्यांकडे कायम ठेवण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, जनसंपर्क , नर्मदा विकास आदी खाती ठेवली आहेत. ज्येष्ठ भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडे गृह खाते सोपविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: important post with jyotiraditya shindes supporters abn 97
Next Stories
1 पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासकीय अधिकार राजघराण्याकडे
2 “भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”
3 ममता बॅनर्जीवर कुमार विश्वास भडकले; म्हणाले, “दीदी इतकी क्रुरता”
Just Now!
X