संसदेने यापूर्वीच मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यास कोणतेही राज्य नकार देऊ शकत नाही, तसे करणे घटनाबाह्य़ ठरेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे.

सीएए मंजूर झाला आहे तर कोणतेही राज्य त्याची अंमलबजावणी करणार नाही असे म्हणू शकत नाही, ते शक्य नाही, तसे करणे घटनाबाह्य़ ठरेल, तुम्ही त्याला विरोध करू शकता, त्याबाबत विधानसभेत ठरावही करू शकता आणि केंद्र सरकारला ते मागे घेण्यास सांगू शकता, असेही सिब्बल म्हणाले.

मात्र त्याची अंमलबजावणी करणार नाही असे म्हणू शकत नाही त्यामुळे समस्या निर्माण होईल आणि गुंतागुंत अधिकच वाढेल, असे केरळ साहित्य महोत्सवात सिब्बल म्हणाले.