21 October 2020

News Flash

इम्रान खान बाहेरख्यालीच, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा आरोप

बुशरा आणि इम्रान खानचा निकाह महिन्याभरापूर्वीच झाला होता

२०१५ मध्ये त्याने पत्रकार रेहम खानशी लग्न केले. मात्र, १० महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला होता.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा विरोधी पक्षनेता इम्रान खान नुकताच तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. अध्यात्मिक गुरु बुशरा मनेकाशी इम्राननं लग्न केलं, पण बुशराशी इम्रानचे प्रेमसंबध मी त्याची पत्नी असल्यापासून सुरू असल्याचा आरोप त्याची पूर्वीश्रमीची पत्नी रेहम खान हिनं केला आहे. २०१५ मध्ये त्याने पत्रकार रेहम खानशी लग्न केले. मात्र, १० महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला होता. ‘बुशरा आणि इम्रान तीन वर्षांपासून ऐकमेकांना ओळखत होते. आमचं लग्न झालं असतानाही या दोघांचे संबध होते त्यामुळे तो बाहेरख्यालीच आहे’ असा आरोप एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं केला आहे.

बुशरा ही अध्यात्मिक गुरु असल्यानं मनशांतीसाठी काही तंत्र शिकून घेण्यासाठी इम्रान खान तिच्याकडे जात होता. बुशरा घटस्फोटीत होती त्यामुळे इम्राननं जानेवारी महिन्यात तिला लग्नासाठी विचारलं होतं. इम्रानला होकार देत गेल्या आठवड्यात या दोघांनी साधेपणानं निकाह केला. पण इम्रानची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खाननं मात्र या दोघांचा निकाह जानेवारीमध्येच झाला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ‘इम्राननं माझ्याशी निकाह केल्यानंतर दोन महिने जगापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. तिसऱ्या निकाहच्यावेळीही त्यानं याची पुरावृत्ती करत निकाह झाल्याचं लपवून ठेवलं’,  असं रेहम ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

इम्राननं १ जानेवारीला बुशराही निकाह केला होता, पण जगापासून ही बाब मात्र लपवून ठेवली होती असा दावाही रेहमनं केला आहे. रेहमच्या या खळबळजनक आरोपानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 11:48 am

Web Title: imran dated bushra when i was his wife said ex wife reham khan
टॅग Imran Khan
Next Stories
1 पक्षस्थापनेपूर्वी कलामांना कमल हसन यांचा सलाम
2 हे काय चाललंय? – सातवीच्या मुलाची शिक्षिकेला बलात्काराची धमकी, सेक्ससाठी आमंत्रण
3 पीएनबी घोटाळ्यातील नक्षत्र, गिली इंडियाचे संचालक राहतात चाळीत
Just Now!
X