पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे पुरवाच्या मागणी केली. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घरातूनच आहेर मिळाला आहे. इम्रान खान यांच्या घटस्फोटीत पत्नी मेहर खान यांनी भारताकडे पुरावे मागण्यापेक्षा ‘जैश’वर कारवाई कर असे सुनावले आहे. तसेच, इम्रान खान म्हणजे पाकिस्तानी सैनाचा पोपट असल्याचा आरोप केला आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्या आदेशानेच दिल्याचा दावा रेहम खानने केला.

सैन्याच्या आशिर्वादानेच इम्रान खान सत्तेत आल्याचा हल्लाबोलही रेहमने केला आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांवर आधीच कारवाई व्हायला हवी होती. जैशने तर पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, असं ट्विट रेहम खानने केलं आहे. जैशसोबत पाकिस्तान सरकारचे संबंध नाहीत तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्नही रेहम खानने उपस्थित केला आहे.

इम्रान खानने पुलवामा हल्ल्याप्रकरणी मंगळवारी भारताला उद्देशून स्पष्टीकरण दिलं. पुरावे द्या आम्ही कारवाई करु, मात्र युद्ध केल्यास आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इम्रान खानने भारताला दिला. त्यानंतर रेहम खानने इम्रानवर आगपाखड केली. इम्रानला जे शिकवण्यात आलं, तसंच तो बोलत आहे. जर तो कारवाई करण्याचा दावा करत असेल, तर त्याने आधी ती कारवाई करुन दाखवावी. आमचा देश आर्थिक बाबतीत काळ्या यादीत जाण्याच्या मार्गावर आहे. हे काही पुलवामा हल्ल्यानंतर नाही, असं रेहम खान म्हणाली.