अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा काश्मीर प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयी बोलत होते तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जपमाळ ओढत होते ही बाब समोर आली आहे. यासंदर्भातला व्हिडिओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआयने हा व्हिडीओ ट्विट केला. इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी भेट घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प आणि इम्रान खान यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सगळ्यांचे लक्ष वेधले गेले ते इम्रान खान यांच्या जपाच्या कृतीकडे. कारण एकीकडे ट्रम्प त्यांच्याशी बोलत होते आणि इम्रान खान जपाची माळ ओढत होते. प्रार्थना करत होते. त्यांची ही कृती कॅमेराने टिपली. पत्रकार जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना भारत, काश्मीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रश्न विचारत होते तेव्हा इम्रान खान जपमाळ ओढून प्रार्थना करताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भाषण केले असे जेव्हा ट्रम्प यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरमधील मानवाधिकार आणि हिंसाचार याबाबत एक प्रश्न विचारला. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तुम्हाला असे पत्रकार कुठे सापडतात? असा प्रश्न विचारला.

जेव्हा जेव्हा ट्रम्प भारताबाबत, काश्मीरबाबत काही मुद्दा मांडत होते तेव्हा इम्रान खान जपाची माळ ओढताना दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. दरम्यान त्यांच्या हाती काल दिसलेली जपमाळ ही जुलै महिन्यात जेव्हा त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा दिसली नव्हती. या संपूर्ण पत्रकार परिषदेदरम्यान सुमारे ९९ वेळा त्यांनी जपमाळ ओढली.

पाहा व्हिडिओ

जेव्हापासून भारताने अनुच्छेद ३७० रद्द केलं आहे तेव्हापासून पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. मध्यंतरीच्या काळात इम्रान खान यांनी भारताविरोधात काही वक्तव्यंही केली होती. मात्र सोमवारी अमेरिकेत जेव्हा इम्रान खान आले तेव्हा ते चांगलेच अस्वस्थ दिसत होते. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत इम्रान खान सातत्याने जपमाळ ओढताना दिसले.