News Flash

बलात्कारासाठी कपडे जबाबदार म्हणणाऱ्या इम्रान यांना पूर्वाश्रमीच्या पत्नीनं सुनावलं

कुराणामधील 'त्या' ओळीची करुन दिली आठवण

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: विकिपिडीया आणि एपीवरुन साभार)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इम्रान खान यांच्या वक्तव्यामुळे महिला अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांनीही आक्षेप नोंदवला आहे. इतकचं नाही तर इम्रान खान यांची घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी या प्रकरणावरुन ट्विट केलं आहे. मागील आठवड्यामध्ये एका लाइव्ह मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “समाजात वाढणाऱ्या अश्लीलतेमुळे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महिलांवर होणाऱ्या बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसत आहे,” असं इम्रान म्हणाले होते. ऑक्सफर्ड सारख्या नामांकित विद्यापिठातून शिकलेल्या इम्रान यांनी वाढत्या बालत्काराच्या प्रकरणांबद्दल बोलताना महिलांनी संपूर्ण कपड्यांमध्ये रहायला पाहिजे (पर्दे में रहें) असा सल्लाही दिला होता. यावरुनच वाद निर्माण झालाय.

“महिलांना वाईट नजरांपासून वाचवण्यासाठीच इस्लाममध्ये परदा पद्धत (महिलांनी शरीर पूर्णपणे झाकून वावरण्याची पद्धत) आहे,” असं मुलाखतीमध्ये इम्रान यांनी म्हटलं. या मुलाखतीमध्ये देशामध्ये महिला आणि लहान मुलांविरोधात वाढत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना रोखण्यासाठी सत्तेत असणारं तुमचं सरकार काय प्रयत्न करत आहे असा प्रश्न एका प्रेक्षकाने पंतप्रधान इम्रान यांना विचारला. यावर उत्तर देताना काही प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवता येत नाहीत. समाजाला स्वत:च अश्लीलतेपासून स्वत:चा बचाव करण्याची गरज आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरण सामाजामध्ये कॅन्सरप्रमाणे पसरत आहेत, असं इम्रान म्हणाले. या वक्तव्यामधून इम्रान यांनी अप्रत्यक्षपणे बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार असतात असं सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे आणि त्यावरुन पाकिस्तानमधील राजकीय वातावरणही चांगलच तापलं आहे.

इम्रान यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरामधून निषेध नोंदवला जात असतानाच त्यांची घटस्फोटित पत्नी जेमिमा यांनी महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पुरुषांवर असते असं म्हटलं आहे. “असे गुन्हे थांबवण्याची जबाबदारी पुरुषांची असते,” असं जेमिमा यांनी कुराणमधील संदर्भ देत म्हटलं आहे. “पुरुष त्यांच्या नजर आणि गुप्तांगावर नियंत्रण ठेवतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा,” असा कुराणमधील संदर्भ जेमिमा यांनी दिलाय.


इम्रान यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये सोशल नेटवर्किंगवरुन चांगलाच संताप व्यक्त केला जातोय. काहीजणांनी ऑनलाइन अर्ज तयार केले असून हजारो व्यक्तींनी त्यावर स्वाक्षऱ्या केलाय. पंतप्रधानांचं हे वक्तव्य चुकीचं, असवेंदनशील आणि धोकादायक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनांनी पंतप्रधानांचे वक्तव्य भीतीदायक आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे बलात्कार पीडितांनाच आरोपी म्हणण्यासारखं असल्याचं मानवाधिकार संघटनांनी म्हटलं आङे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 3:56 pm

Web Title: imran khan ex wife others hit back after rape remark scsg 91
Next Stories
1 परदेशातून महाराष्ट्रात लसी आयात करण्याच्या मागणीवर आदित्य ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, “मॅडम…”
2 ध्वजारोहण गुन्हा नाही, पण लाल किल्ल्यातून फेसबुक लाइव्ह करणं चूक; कोर्टात दिप सिंधूला उपरती
3 लसीकरणावरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार वाद सुरु असतानाच पवार म्हणाले, “कालच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी…”
Just Now!
X