News Flash

भारतातही इम्रान खानची अनौरस मुलं : रेहम खान

इम्रान खानचे १९७० च्या दशकात बॉलिवूडमधील एका सुपरस्टार अभिनेत्रीशी देखील संबंध होते. इम्रान खाननेच त्या अभिनेत्रीचा पाठलाग करुन तिच्याशी ओळख केली होती

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक- ए- इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांच्या पुस्तकावरुन सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. इम्रान खान यांची पाच अनौरस मुलं असून यातील काही भारतातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रेहम खान यांनी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध आणि खासगी आयुष्यातील अन्य काही गोष्टी उघड केल्या आहेत. इम्रान खान यांची पाच अनौरस मुलं असून यातील काही भारतातील आहेत. यातील सर्वात मोठा मुलगा हा ३४ वर्षांचा आहे. ही गोष्ट माझ्याशिवाय इम्रान खानच्या पहिल्या पत्नीलाच माहिती असल्याचे रेहम खान यांनी पुस्तकात म्हटले आहे. इम्रान खानचे १९७० च्या दशकात बॉलिवूडमधील एका सुपरस्टार अभिनेत्रीशी देखील संबंध होते. इम्रान खाननेच त्या अभिनेत्रीचा पाठलाग करुन तिच्याशी ओळख केली होती, असे तिने म्हटले आहे.

रेहम खान पुस्तकात म्हणतात, इम्रान खानने अनौरस मुलांबाबत केलेला खुलासा ऐकून मला धक्काच बसला. त्या महिलांनी जाहीरपणे याबाबत वाच्यता का केली नाही, असा प्रश्नही मी त्याला विचारला होता. मात्र, त्या महिलाही विवाहित होत्या आणि ही गोष्ट जाहीर करुन त्या महिलांना त्यांचा संसार मोडायचा नव्हता, असे उत्तर इम्रान खानने दिल्याचे रेहम खान यांनी नमूद केले. इम्रान खानला कुराणही वाचता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या नवीन खुलाशांबाबत इम्रान खान यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रेहम खान यांचे पुस्तक अॅमेझॉनवर गुरुवारी ई- बुक स्वरुपात उपलब्ध झाले आहे. या पुस्तकात रेहम खान यांनी इम्रान खान यांच्या खासगी जीवनातील धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला असून इम्रान खानसह माजी क्रिकेटपटू वासीम अक्रम यांनी देखील रेहम खानला नोटीस पाठवली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून रेहम खान यांच्या पुस्तकामुळे इम्रान खान यांना फटका बसेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 11:41 am

Web Title: imran khan illegitimate indian children ex wife reham khan book
Next Stories
1 पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती
2 ‘मी मुशर्ऱफसारखा भित्रा नाही’, नवाज शरिफ आणि मरियम यांना आज अटक
3 नवाज शरिफ यांच्या नातवंडांना लंडन पोलिसांनी घेतलं ताब्यात
Just Now!
X