वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी इम्रान खान यांना पोपट म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणजे ISI चे पोपट आहेत. ते आयएसआयचीच भाषा बोलतात अशी टीका भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर आयोजित केलेल्या एका चर्चासत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
इम्रान खान हा उभा करण्यात आलेला एक बनावटी चेहरा आहे. हे माझे व्यक्तीगत मत असून ही पक्षाची भूमिका नाही असे स्वामी यांनी स्पष्ट केले. एफसीसी क्लबने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे आता फक्त पाक व्याप्त काश्मीरचा विषय उरला असून तो भारताचा भूभाग आहे असे स्वामी म्हणाले. इम्रान खानबद्दल बोलत असाल तर ते आयएसआयचे पोपट आहेत. ते फक्त ISI चीच भाषा बोलतात आहे असे स्वामी म्हणाले.
सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या पद्धतीवर टीका केली. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता काश्मीर चार देशांचा प्रश्न बनला आहे. चीन आणि अमेरिकाही आता हस्तक्षेप करत आहेत असे राजा म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2019 5:59 pm