काश्मीर प्रश्नी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरुन भारतात गदारोळ सुरु असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सुटणार नाही असे म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केल्यानंतर काही तासांनी इम्रान खान यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या विधानाचे समर्थन केले.

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या इम्रान यांनी सोमवारी ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी अफगाण शांती प्रक्रियेसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. काश्मीर प्रश्नी मोदींनी आपल्याला मध्यस्थी करायला सांगितली असे ट्रम्प यांनी विधान केले होते. भारताने त्यांचे हे विधान लगेच फेटाळून लावले.

भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. भारताच्या निषेधानंतर अमेरिकेने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काश्मीर वाद भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. भारताच्या निषेधानंतर अमेरिकेने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काश्मीर वाद भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. जी २० परिषदेच्यावेळी ओसाकामध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे काश्मीर प्रश्नी मदत मागितली होती असे विधान ट्रम्प यांनी केले होते.