पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कालच आम्ही पहिले युद्ध सुरु करणार नाही. भारताविरोधात पहिला अण्वस्त्राचा वापर करणार नाही असे म्हटले होते. इम्रान खान यांनी हे विधान करुन एक दिवस होत नाही तोच पाकिस्तानने पलटी मारली आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सोमवारी संध्याकाळी लाहोरच्या राज्यपाल निवासात शीख समुदायाच्या सदस्यांना संबोधित करताना आमच्याकडून कधीही पहिली सुरुवात होणार नाही असे इम्रान म्हणाले होते. दक्षिण आशियामध्ये अण्वस्त्र युद्धाचा धोका आहे असे इम्रान आधी म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताविरोधात पहिला अण्वस्त्राचा वापर करणार नाही असे म्हटले होते.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून इम्रान खान सतत अण्वस्त्र युद्धाचे इशारे देत आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. दोन्ही देशांमधील वाढता तणाव जगासाठी धोकादायक आहे. मला भारताला सांगायचे आहे युद्ध कुठल्याही समस्येचे उत्तर नाही. युद्ध जिंकणारा सुद्धा पराभूतच असेल. युद्धातून अनेक प्रश्न जन्म घेतात असे इम्रान म्हणाले होते. इम्रान खान यांच्या विधानानंतर काही तासातच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पंतप्रधानांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असे स्पष्ट करण्यात आले.

काश्मीरसंबंधी इम्रान खान सरकारकडे सबळ पुरावेच नाहीत
काश्मीर मुद्यावरुन भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच वकिलाने झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पाकिस्तानी वकिल खावर कुरेशी यांच्या वक्तव्यामुळे इम्रान खान पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. इम्रान खान यांनी त्यांच्या टि्वटमधून भारतावर नरसंहाराचे आरोप केले होते.

काश्मीरमधल्या नरसंहाराच्या आरोपांची पृष्टी करण्यासाठी भक्कम पुरावे नसल्याची कबुली खावर कुरेशी यांनी दिली आहे. सबळ पुराव्यांअभावी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण नेणे पाकिस्तानसाठी खूप कठीण आहे असे खावर कुरेशी यांनी म्हटले आहे. ज