News Flash

‘नीट’ची परीक्षा आता मराठीसह प्रादेशिक भाषांमध्येही होणार!

राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 'नीट' परीक्षा प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे. (संग्रहित छायाचित्र)

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये घेण्यात येणारी ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) आता इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगूमध्ये परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

लोकसभेत आज, शुक्रवारी नीटसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लेखी उत्तर देताना, २०१७ मध्ये होणारी नीट परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे. पुढील वर्षी ही परीक्षा मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगूमध्ये देण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. ‘इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट, १९५६मधील सेक्शन १० डी’ नुसार, हिंदी, इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही ही परीक्षा देता येणार आहे. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर केंद्र सरकारने २०१७ मध्ये घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, तामिळ, तेलगू या प्रादेशिक भाषांमध्ये देण्यात मुभा दिली आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष नियम निश्चित करण्यात आले नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारांच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाला कोणताही धक्का या ‘नीट’बाबत घेतलेल्या निर्णयाने लागणार नाही, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सीबीएसई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ( एमसीआय) यांचा नीट प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याला विरोध होता. असे केल्यास पेपर फुटण्याची भीती असल्याचे ‘सीबीएसई’चे म्हणणे होते. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके इंग्लिश वगळता अन्य भाषांमध्ये उपलब्ध नसल्याने हा पर्याय व्यवहार्य ठरणार नसल्याचे म्हणणे ‘एमसीआय’ने मांडले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 6:31 pm

Web Title: in 2017 neet will be held in regional languages
Next Stories
1 ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळा: माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना सीबीआयकडून अटक
2 जिल्हा बँक जुन्या नोटा स्वीकारु शकणार की नाही, सुप्रीम कोर्टाने मागितले सरकारकडून उत्तर
3 भारतात येणार प्लास्टिक नोटा; सरकारची माहिती
Just Now!
X