News Flash

Good News : समाधानकारक पाऊस पडणार – हवामान खाते

हा पाऊस शेती उत्पादन व देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार

(संग्रहित छायाचित्र)

भारतात यावर्षी सरासरी पाऊस होईल असे राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आले आहे. “हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिस-या क्रमाकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नसते, हे सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून असतं,” रॉयटर्सने नमूद केले आहे.

पर्जन्यमानाचे प्रमाण हे प्रदीर्घ काळासाठी सरासरी ९६ टक्के राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. तर, जूनपासून सुरुवात होणा-या संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामासाठी हवामान खात्याच्या मते पावसाची सरासरी, ९६ टक्के आणि १०४ टक्केच्या ५० वर्षांच्या सरासरीच्या १०४ सेंटीमीटरमध्ये निर्धारित करते. जुलै महिन्यात देशात ९६ टक्के तर ऑगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशभरात वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस हा येत्या तीन-चार महिन्यात पडत असून त्यावरच भारतातील कृषि क्षेत्राचं यश अवलंबून असल्याचंही रॉयटर्सनं नमूद केलं आहे.

विभागवार पाहिले तर पश्चिमोत्तर भारतात मान्सून काळात ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर या काळात मध्य भारतात याच्या १०० टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर पूर्वोत्तर भारतात मान्सून काळात ९१टक्के पाऊस होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 5:38 pm

Web Title: in 2019 india likely to get average rains
Next Stories
1 …म्हणून राज्यवर्धनसिंह राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान नाही
2 लोकसभा पराभव : राष्ट्रवादीची चिंतन बैठक; शरद पवार घेणार आढावा…
3 ट्रम्प बरोबर चर्चा फेल झाल्याने किमची सटकली, पाच अधिकाऱ्यांना देहदंड
Just Now!
X