काही काळापूर्वी मोदी सरकारचा हिस्सा राहिलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आता भाजपाविरोधात भुमिका घेतली आहे. २०१९मध्ये भाजपाला हारवण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र निवडणुक लढवतील. त्यामुळे २०१९मध्ये प्रादेशिक पक्षच किंगमेकर ठरतील, असे नायडू यांनी म्हटले आहे. एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.


नायडू म्हणाले, माझा नोटाबंदीला पाठींबा होता. कारण मला त्यावेळी वाटलं होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे योग्य असेल. मात्र, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे बँका दिवाळखोरीत निघाल्या. लोकांचा बँकिंग क्षेत्रावरुन विश्वास उडाला. यापूर्वी आपण कधीही चलन पुरवठ्यातील घट पाहिली नव्हती.


२०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत प्रादेशिक पक्षच किंगमेकर असतील. सर्व पक्ष भाजपाला हारवण्यासाठी एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पराभवाला समोरे जावे लागेल. हे चंद्राबाबूंचे वक्तव्य यासाठी महत्वाचे मानले जात आहे. कारण, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांनी एकजूट दाखवली होती. यावेळी भाजपाविरोधी सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते एकत्र दिसले होते. या कार्यक्रमाला स्वतः चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते.