News Flash

पश्चिम बंगाल : खेकडे पकडायला गेलेल्या माणसाने वाघाच्या हल्ल्यात गमावले प्राण

सुंदरबन भागातली धक्कादायक घटना

संग्रहित छायाचित्र

पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोष्टो नाईया असं या व्यक्तीचं नाव असून तो South 24 Parganas जिल्ह्यातील देऊलबारी भागात राहत होता.

वाघाने गोष्टोवर हल्ला करत त्याला घनदाट जंगलात ओढून नेलं. गोष्टोसोबत खेकडे पकडायला गेलेल्या त्याच्या मित्रांना ही गोष्ट समजताच त्यांनी तात्काळ स्थानिक अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. गोष्टोचा शोध घेण्यासाठी मित्र जोरजोरात हाक मारत असताना, वाघाने गोष्टोला मध्येच सोडत धूम ठोकली. मित्रांनी गोष्टोला गावात आणलं मात्र तोपर्यंत त्याने आपले प्राण सोडले होते. सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्षातून अनेक बळी गेल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 9:10 pm

Web Title: in a bid to catch crabs in sunderbans man loses life to tiger in west bengal psd 91
Next Stories
1 सीमेवरुन तणाव असतानाच नेपाळचा मोठा निर्णय, संसदेत विधेयकही केलं मंजूर
2 पतंजलीचं औषध घेतल्यानंतर करोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले-आचार्य बालकृष्ण
3 “नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला; देशाला उपचार हवेत, प्रचार नको”
Just Now!
X