News Flash

आज रात्री व्हाइट हाऊसबाहेर दिसणार राम मंदिराचे फोटो, अमेरिकेतही भूमिपूजनाची जोरदार तयारी

अमेरिकेतही साजरा होणार अयोध्येतील भूमिपूजन सोहळा

अयोध्येमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतही साजरा केला जाणार आहे. अयोध्येतील भूमिपूजनाच्या निमित्ताने अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा- कोरिया आणि अयोध्येचं आहे विशेष नातं ; कोरियन राजदूतानेच केला खुलासा

मंगळवारी यूएस कॅपिटोल हिल येथे खास जाहीराती प्रदर्शित करण्यासाठी बनवलेल्या ट्रकवर राम मंदिराचे डिजिटल फोटो दाखवले जाणार आहेत. भूमिपूजनाच्या निमित्ताने अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या विशेष पूजा आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करणार असल्याचे तिथे स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी सांगितले.

आणखी वाचा- टाइम्स स्क्वेअरवरील प्रभू रामांच्या प्रतिमेला मुस्लिमांचा विरोध ; जाहिरात कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय

आज रात्री कॅपिटोल हिल आणि व्हाइट हाऊसबाहेर फिरत्या ट्रकमधून LED डिस्प्लेद्वारे भव्य श्री राम मंदिराचे फोटो प्रदर्शित केले जातील असे वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी सांगितले. न्यू यॉर्कमध्येही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. तिथे वेगवेगळे होर्डिंग्स भाडयावर घेतले असून त्यावर प्रभू रामचंद्र आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे फोटो दाखवले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:13 pm

Web Title: in america indian americans are celebrating ram temple bhoomi poojan dmp 82
Next Stories
1 यूपीएससीचा निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला
2 रेमडेसिवीर आता जेनेरिक स्वरुपात; करोनावर करणार मात
3 टाइम्स स्क्वेअरवरील प्रभू रामांच्या प्रतिमेला मुस्लिमांचा विरोध ; जाहिरात कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय
Just Now!
X